Belagavi

आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी केली कल्लेहोळ ग्रामस्थांची विचारपूस

Share

बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील कल्लेहोळ गावातील हळदी कुंकुम कार्यक्रमात सहभागी होऊन आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी ग्रामस्थांची विचारपूस करून परिसरात सुरू असलेल्या विकासकामांची आठवण करून दिली.

आ. लक्ष्मी हेब्बाळकर यांनी बेळगाव तालुक्यातील कल्लेहोळ येथे झालेल्या हळदीकुंकू कार्यक्रमात सहभाग घेतला. यावेळी त्यांनी ग्रामस्थांची विचारपूस केली. त्यांनी गावात यापूर्वी कधीही न झालेली विकास कामे हाती घेतल्याबद्दल ग्रामस्थांनी आ. हेब्बाळकर यांचे आभार मानले आणि त्यांच्या कामाचे कौतुक केले. दरम्यान, गावातील महिलांनी त्यांना हळदीकुंकू देऊन शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी युवक काँग्रेसचे नेते मृणाल हेब्बाळकर यांचेही भाषण झाले. यावेळी ग्रामस्थ अश्विनी कन्नुरकर, एल. एन. पाटील, युवराज कदम, वसंत पाटील, निर्मला शहापुरकर, धनश्री पाटील, कृष्णा पाटील, लक्ष्मण कणबरकर, राजाराम देवरमणी, पांडुरंग देवरमणी, स्वराज युवक मंडळाचे कार्यकर्ते आदी उपस्थित होते.

Tags:

kallehol-legislator-laxmi-hebbalkar legislator