गोकाक तालुक्यातील एका वृद्धाने विविध मागण्यांच्या पूर्ततेच्या मागणीसाठी गोकाकहून बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत चक्क सायकल रॅली काढून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
होय, सायकलवर बसून खांद्यावर पिवळी आणि लाल शाल घालून घोषणाबाजी करणारी व्यक्ती म्हणजे गोकाक तालुक्यातील अडीबट्टी गावातील कल्लय्या निंगय्या मठपती होय. बेडजंगम जातीला बेडजंगमचे आरक्षण मिळावे, सर्व पेन्शन, भत्त्यात वाढ करावी, सिलिंडरच्या दरात कपात आणि जनलोकपाल विधेयकाची अंमलबजावणी या चार प्रमुख मागण्यांसाठी गुरुवारी सकाळी सायकलवरून आपले गाव अडीबट्टी ते बेळगाव अशी सायकल रॅली काढत ते आज जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले.

आपल्या या आगळ्या आंदोलनाची माहिती इनन्यूज-आपली मराठीला देताना कल्लया मठपती म्हणाले, ते गोकाक तालुक्यातील अडीबट्टी गावातून गोकाकला येऊन, तेथील बसवेश्वर सर्कलमधून सायकलने जिल्हाधिकारी कार्यालयात आले. आमच्या जंगम समाजाला बेडजंगम जमातीचे आरक्षण द्यावे, संध्या सुरक्षा, अपंग, विधवा वेतन, मनस्वी व इतर योजनांतील निवृत्ती वेतनात वाढ करावी. सिलिंडरचा दर खूप आहे तो जास्त कमी केला पाहिजे. तसेच जनलोकपाल विधेयकाची अंमलबजावणी करावी. माझ्या या चार मागण्या केंद्र आणि राज्य सरकारने पूर्ण केल्या पाहिजेत अन्यथा तीव्र संघर्ष करावा लागेल, असा इशारा त्यांनी दिला.
एकंदर, कल्लय्या मठपती या वृद्धाने आपल्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी गोकाकच्या पायथ्यापासून बेळगाव येथील जिल्हाधिकारी कार्यालयात सायकलने पोहोचून जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधल्याचे दिसून आले.


Recent Comments