मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या उपस्थितीत सेंटर फॉर इफेक्टिव्ह गव्हर्नन्स ऑफ इंडियन स्टेट्स आणि कर्नाटक सरकार यांच्यात आज एक करार करण्यात आला.
सेंटर फॉर इफेक्टिव्ह गव्हर्नन्स ऑफ इंडियन स्टेट्स ही संस्था देशातील राज्यांना त्यांच्या प्रशासनात परिणामकारकता आणण्यासाठी वेगवेगळ्या स्वरूपात सहाय्य आणि मार्गदर्शन करते. त्यामुळे ही संस्था आणि कर्नाटक सरकार यांच्यात आज एक करार करण्यात आला.
मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या उपस्थितीत या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. यावेळी वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आयएसएन प्रसाद, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव एन. मंजुनाथ प्रसाद, कर्मचारी आणि प्रशासकीय सुधारणा विभागाचे सचिव श्रीवत्स कृष्णा, आश्रित जगदाळे, कार्तिक मुरलीधरन, विजय पिंगळे आणि अंकित उपस्थित होते.


Recent Comments