बेळगावातील गौरी महिला मंडळातर्फे बालदिन अर्थपूर्णरित्या साजरा करण्यात आला. यानिमित्त आयोजित फॅन्सी ड्रेस स्पर्धेचा चिमुकल्यांनी आनंद लुटला.

गौरी महिला मंडळाच्या वतीने सदाशिव नगर येथील शिवालयात काल १४ नोव्हेंबर रोजी देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त मुलांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या प्रा. भारती वाळवेकर उपस्थित होत्या. त्यांनी मुलांचे अधिकार आणि त्यांच्या रक्षणासाठी केलेल्या पॉक्सो कायद्याची माहिती मुलांना व पालकांना दिली. मुलांवर लैंगिक हिंसाचार हा दंडनीय गुन्हा आहे, यासाठी दोषींना पॉक्सो कायद्याद्वारे शिक्षा होऊ शकते. त्याचप्रमाणे आपत्कालीन परिस्थितीत 1098 क्रमांकावर फोन करून मदत घेऊ शकता, असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमात गौरी महिला मंडळाच्या अध्यक्षा जयश्री करुडकर, उपाध्यक्षा प्रेमा एत्तीनमनी, पदाधिकारी सुजाता गोकाक, शिल्पा वागराळी, राजश्री जोशी, लता पाटील, दीपा संपगाव, गौरी पाटील, मंजुळा पाटील आदी उपस्थित होते. फॅन्सी ड्रेस स्पर्धेत सुमारे 25 मुलांनी सहभाग घेतला. विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.


Recent Comments