कुंदानगरी बेळगावात साहित्य आणि सांस्कृतिक उत्सव-2022 उत्साहात, यशस्वीपणे पार पडला. अनेक लोकसाहित्यकार, कलावंतांनी सहभाग घेऊन आपले कला, साहित्यविषयक विचार मांडले.
कन्नड विकास प्राधिकरण, बेंगळूर, श्री मुरसिद्धेश्वरा कलापोषक संघ, मुरगुंडी यांच्या वतीने कन्नड साहित्य भवन, बेळगाव येथे आज साहित्य आणि सांस्कृतिक महोत्सव-2022 कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कर अधिकारी व साहित्यिक सुरेश कोरकोप्प यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी बोलताना सुरेश कोरकोप्प म्हणाले की, श्री मुरसिद्धेश्वरा कला पोषक संघ राज्यभरात सातत्याने सांस्कृतिक, साहित्यिक आणि कलात्मक कार्यक्रम आयोजित करत आहे, व्यासपीठ तयार करत आहे आणि हजारो कलाकारांची ओळख करून त्यांना प्रोत्साहन देत आहे. यातून कन्नड भाषा आणि प्रदेशाची कीर्ती आणखी पसरू दे, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली.
याप्रसंगी बेळगाव जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधून आलेल्या लेखक व विचारवंतांनी आपले साहित्य व कलाविषयक विचार मांडले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षक, रामदुर्गचे साहित्यिक आनंद हक्केनवर होते. ज्येष्ठ कन्नड आंदोलनकार अशोक चंदरगी यांनी प्रास्ताविक केले. आकाशवाणी कलाकार श्रीरंग जोशी यांनी दीपप्रज्वलन केले. यावेळी सुलेमान जमादार, आर. बी. कट्टी, श्री मुरसिद्धेश्वर कला पोषक संघाचे अध्यक्ष एल. एस. वाघमोडे आदी उपस्थित होते.


Recent Comments