Belagavi

बेळगावात उत्तर विभागीय होमगार्ड क्रीडा स्पर्धा सुरू

Share

दररोज दडपणाखाली काम करणार्‍या गृहरक्षकांनी आज सर्व दडपण बाजूला ठेवून विविध खेळांमध्ये सहभागी होऊन मनसोक्त आनंद लुटला. निमित्त होते, गृहरक्षकांच्या वार्षिक क्रीडास्पर्धांचे.

होय, बेळगाव जिल्हा पोलीस कवायत मैदानावर उत्तर विभागीय स्तरावरील होमगार्ड्स व्यावसायिक आणि क्रीडा मेळावा- 2022 आजपासून सुरु झाला. बेळगावचे डीसीपी रवींद्र गडादी यांच्या हस्ते क्रीडा स्पर्धेला चालना देण्यात आली.

स्पर्धेचे उदघाटन करून बोलताना डीसीपी रवींद्र गडादी म्हणाले की, खेळ आणि खाकी यांचा अतूट संबंध आहे. त्याचप्रमाणे खेळातूनही खूप काही शिकण्यासारखे आहे. खेळाचा आपल्या जीवनाशी खूप जवळचा संबंध आहे. खेळात ध्येय गाठण्याची बांधिलकी असते, एकाग्रता असते, विजय-पराजय असतो. या सर्व गोष्टी आपल्या आयुष्यातही लागू होतात. जिंकणे किंवा हरणे काही फरक पडत नाही. त्याचा आनंद घ्या. खेळात सहभाग खूप महत्वाचा आहे. ज्यांच्याकडे जिद्द आणि एकाग्रता आहे त्यांचा विजय होईल. ते या तीन दिवसांचा आनंद घेतील आणि भविष्यात पुन्हा ड्युटी करावी लागेल, असे त्यांनी खेळाडूंना प्रोत्साहन दिले.

स्पर्धा उदघाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होमगार्डचे कमांडंट डॉ. किरण रुद्रानाईक होते. गदगचे कमांडंट विश्वनाथ यलमाली, विजापूरचे कमांडंट शिवानंद शिरूर, धारवाडचे कमांडंट सुनील शिरूर, बागलकोटचे कमांडंट डीवायएसपी प्रशांत मुनवळ्ळी, राकेश गोनाळ, व्हीपी नरसन्नावर, लक्ष्मी जंगन्नावार आदी मान्यवर, अधिकारी व होमगार्ड यावेळी उपस्थित होते. आजपासून तीन दिवस या क्रीडा स्पर्धा चालणार आहेत.

Tags:

belagavi-home-guard-sports-tournament/