Hukkeri

यरनाळ मठ सर्वधर्मियांचे श्रद्धास्थान आ. दुर्योधन ऐहोळे

Share

हुक्केरी तालुक्यातील यरनाळ येथील श्री महामाता कालिकादेवी मठ हा सर्वधर्मीयांचे श्रद्धास्थान असलेला आश्रम आहे असे रायबागचे आमदार दुर्योधन ऐहोळे यांनी सांगितले.

यरनाळ येथील श्री महामाता कालिकादेवी मठात कालिकादेवीचा रथोत्सव अत्यंत भक्तिभावाने आणि उत्साहात पार पडला. त्यात सहभाग घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना आ. दुर्योधन ऐहोळे म्हणाले, श्री ब्रह्मानंद अज्जा यांचा कालिकादेवी मठ हा जात, पात, धर्म असा भेदभाव न करणारा निपक्ष मठ आहे. मठात येणाऱ्या भाविकांकडून कोणत्याही प्रकारची देणगी स्वीकारली जात नाही, फक्त भक्ती, श्रद्धा पुरेशी आहे असे ते म्हणाले.

यानंतर शिवानुभव गोष्टी पार पडली. त्यात विविध पुजारी व मान्यवरांनी श्री ब्रह्मानंद अज्जा यांना अभिवादन केले. बेळगाव जिल्हा अनुसूचित जाती अत्याचार निवारण समितीचे अशासकीय सदस्य सुरेश तळवार म्हणाले की, मठाचे प्रमुख ब्रह्मानंद अज्जा हे भाविकांच्या समस्यांना उत्तरे देऊन त्यांना मार्गदर्शन करणारे लोकप्रिय स्वामीजी आहेत.

यावेळी क्यारगुड्ड येथील अभिनव मंजुनाथ महाराज, बेळवी आणि कोटबागीच्या सिद्धारूढ मठाचे गुरु, ​​रबकवी स्वामीजी आणि तवगमठाचे गुरु उपस्थित होते.
नंतर कालिकादेवी रथोत्सव आणि पालखी उत्सव झाला. यावेळी मुकुंद मठद, रमेश हुंजी, गोपाल मठद, शंकरय्या मठद, अनिल चौगले, आनंद होसमनी, उदय बोळमाळ, उमेश बंगळूरी, संजीव नाईक, विजय पाटील, तसेच बेळगाव, गोवा महाराष्ट्र भागातून हजारो भाविक सहभागी झाले होते.

Tags:

hukkeri-duryodhan-aihole/