राज्यसभा सदस्य इरण्णा कडाडी यांच्या कारला घेराव घालण्याच्या प्रकरणासंदर्भात आज बेळगावात भाजप नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक झाली.
घटप्रभा येथे राज्यसभा सदस्य इरण्णा कडाडी यांच्या वाहनाला काँग्रेस कार्यकर्त्यांनी घेराव घातल्याची घटना काल शुक्रवारी सायंकाळी उशिरा घडली होती. या संदर्भात आज बेळगावात भाजप नेत्यांची महत्वाची बैठक पार पडली. बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना राज्यसभा सदस्य इरण्णा कडाडी यांनी, पक्षाच्या आदेशानुसार सतीश जारकीहोळी यांचा त्यांच्या वक्तव्याबद्दल आम्ही निषेध केला होता. नंतर सतीश जारकीहोळी यांनी आपले वक्तव्य मागे घेतले. काल घटप्रभा येथे काहींनी माझ्या गाडीवर हल्ला केला.

यानंतर आमच्या सर्व नेत्यांनी मला बोलावून घेतले. मी येऊन सर्व माहिती देईन असे सांगितले. त्यामुळे घडलेला प्रकार मी आज पक्षाच्या सर्व नेत्यांना सविस्तरपणे सांगितला. ते निरपराध लोकांचा राजकारणासाठी वापर करण्याचा प्रयत्न करत आहेत. हे लोक कोण आहेत याबद्दल मला सर्व माहिती आहे. घटना सर्व पूर्वनियोजित आहे. मी सर्व कार्यक्रमांना जाऊन पोलीस विभागाला माहिती देईन. पोलिसांनी मला आंदोलनाबाबत माहिती दिली नसल्याचे त्यांनी सांगितले.
माजी उपमुख्यमंत्री आणि भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष लक्ष्मण सवदी यांनी आज इरण्णा कडाडी यांच्या कारला घेराव घातल्याबद्दल संताप व्यक्त केला. इरण्णा कडाडी यांना धीर देण्याचे काम आम्ही केले आहे. ही काही गंभीर घटना नाही. हा प्रकार राजकारणात सामान्य आहे. ही अधिकृत बैठक नाही. त्याबद्दल कोणी पराचा कावळा करू नका. आम्ही चिठ्ठी देऊन बोला म्हटलेले नाही. वक्तव्याने हिंदू धर्माचा अपमान झाला असे वाटल्याने आम्ही आंदोलन केले. कधी कधी अंगावर ढेकूण ठेवल्यासारखं होतं.
विधान मागे घेतल्याने या विषयावर पडदा पडलाय असं मला वाटतं. जारकीहोळी समर्थकांच्या उपोषणाबाबत माझं काही म्हणणं नाही. ते वक्तव्य म्हणजे, छत्रपती संभाजी महाराजांचा अवमान केल्याची गोष्ट आहे, असे ट्विट महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं आहे. भालचंद्र, रमेश यांनी सतीश जारकीहोळी यांच्या वक्तव्याचा निषेध केला नाही. या वक्तव्याने भावाला लाज वाटली पाहिजे, म्हणून ते गप्प आहेत. पक्षाच्या निदर्शनावर कोणीही टीका केली नाही. मीसुद्धा आंदोलनात सहभागी झालो नाही, असे ते म्हणाले.
या बैठकीत भाजपचे ज्येष्ठ नेते सहभागी झाले होते.


Recent Comments