Khanapur

सतीश जारकीहोळी यांच्या समर्थनार्थ खानापूरमध्ये दलितांची निदर्शने

Share

केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांच्या समर्थनार्थ खानापूरमध्ये आज दलित संघटनांनी निदर्शने केली. खानापूर येथील विविध दलित संघटनांच्या वतीने सतीश जारकीहोळी यांच्या विरोधात निदर्शने करणाऱ्या भाजपवर कायदेशीर कारवाईच्या मागणीचे निवेदन देण्यात आले.

11 रोजी खानापूर तालुक्यातील भाजप, संघ परिवार, सर्व हिंदुत्ववादी संघटनांनी एकजुटीने पोलीस ठाण्यासमोर खानापूर शहरातील शिवस्मारकासमोर सतीश जारकीहोळी यांचा पुतळा जाळून त्यांच्या प्रतिमेचा अपमान केल्याच्या निषेधार्थ दलित संघटनांनी धरणे आंदोलन केले.

खानापूरच्या सर्व दलित संघटनांच्या युतीने खानापूर आंबेडकर पार्क येथून आंदोलन सुरू केले आणि खानापूर पोलीस ठाण्यात पोहोचले तेथे त्यांनी खानापूरचे पोलीस निरीक्षक सुरेश शिंगी यांना याबाबत कायदेशीर कारवाई करण्याचे आवाहन केले.

यावेळी खानापूर नगर पंचायतीचे माजी स्थायी समिती अध्यक्ष दलित नेते लक्ष्मण मादार म्हणाले, सतीश जारकीहोळी यांनी केलेल्या विधानाबाबत स्पष्टीकरण देऊन याबाबत चर्चेचे निमंत्रण दिले. तरीही त्यांची प्रतिमा जाळून त्यांचा अवमान करण्यात आला आहे. या निंदनीय कृत्यावर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी समस्त दलितांच्या वतीने मागणी केली.

यावेळी राजू कांबळे, संदीप कांबळे, शरद होननायक, राजू नायक, डी.ए.हवनूर, निरुपद्दी कांबळे, रायप्पा चलवाडी, परशुराम हलबावी, तोहेद चांदवले, गुड्डू ठेकडी, हनुमंता पुजारी यांच्यासह अनेक दलित संघटनांचे नेते व दलित संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags: