बेळगाव दक्षिण मतदारसंघात बाँडपेपरच्या आधारे जागा घेऊन बांधलेली घरे कायदेशीर करण्यासाठी आमदार अभय पाटील यांनी नवा प्रयोग सुरु केला आहे.
बेळगाव दक्षिण मतदारसंघात सुमारे 10 हजार घरे बाँड तत्त्वावर खरेदी केलेल्या जमिनींवर बांधण्यात आली आहेत. या घरांचे मालक महापालिकेला नियमित कर भारतात. मात्र, त्यांनी ज्या ठिकाणी घर बांधले, त्या जागेची अद्यापही त्यांच्या नावावर नोंद झालेली नाही. त्यामुळे बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांनी ही जागा घरमालकांच्या नावावर करण्याचा नवा प्रयोग सुरू केला आहे.

याबाबत आमदार अभय पाटील यांनी इन न्यूज-आपली मराठीशी बोलताना सांगितले की, कायद्यात तरतूद नसतानाही बाँडच्या आधारे जमीन खरेदी करून घरे बांधणाऱ्यांची नावे नोंदविण्याची प्रक्रिया विशेष प्रयोगाद्वारे करण्यात येत आहे. ही प्रक्रिया दररोज सुरू होते. येत्या काही दिवसांत ती यशस्वी झाल्यास इतर भागातही विस्तारित करण्यात येईल, असे ते म्हणाले.
यावेळी बाँडवर जमीन खरेदी करून घरे बांधलेले घरमालक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.


Recent Comments