Belagavi

हिंडलगा कारागृहात कायदा जागृती सहाय्य कार्यक्रम

Share

हिंडलगा, बेळगाव येथील मध्यवर्ती कारागृहात कायदेविषयक जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण बेळगाव व मध्यवर्ती कारागृह हिंडलगा यांच्या वतीने ७५ व्या स्वातंत्र्यदिन अमृत महोत्सवानिमित्त कायदेविषयक जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सदस्य सचिव वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश पी. मुरली मोहन रेड्डी यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मध्यवर्ती कारागृहाचे मुख्य अधीक्षक कृष्णकुमार होते. यावेळी जेलर वाय. एस. नाईक, अभिषेक, राजेश, उपाध्याय एस. एस. यादगुडे आदी उपस्थित होते. यावेळी अडचणीतील नागरिकांना कायदा सेवा प्राधिकरणाकडून मिळणाऱ्या कायदेशीर सेवांबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.

Tags:

law awareness program at hindalga jail