हुक्केरी तालुक्यातील यरनाळ गावचा महामाता कालिकादेवी रथोत्सव उद्या शुक्रवारी होणार असल्याचे ब्रह्मानंद अज्जा यांनी सांगितले.

आज गुरुवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना ब्रह्मानंद अज्जा म्हणाले की, कालिकादेवी जत्रेत दरवर्षीप्रमाणे गायत्री होम, चंडिका होम, कामेष्टी यज्ञ, हवन आदी धार्मिक कार्यक्रम तीन दिवस झाले असून, शेवटच्या दिवशी उद्या शुक्रवारी हरगुरु चरमूर्तींच्या उपस्थितीत शिवानुभव गोष्टी आणि पालखी उत्सव, रथोत्सव आयोजित केला आहे. भक्तांनी उपस्थित राहून देवीचा आशीर्वाद घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी मंदिराचे प्रभारी मुकुंद मठ, गोपाळ मठ व सदस्य उपस्थित होते.


Recent Comments