बेळगाव जिल्ह्यातील खानापूर तालुका हा वनक्षेत्राने समृद्ध आहे. ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेला तालुका असल्याने येथील पर्यटनावर अधिक भर द्यावा, असे आवाहन माजी आमदार अरविंद पाटील यांनी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना केले आहे.

खानापूर येथील भाजपच्या जनसंकल्प अधिवेशनाला उपस्थित असलेले मुख्यमंत्री बोम्मई यांची भेट घेऊन माजी आमदार अरविंद पाटील यांनी खानापूर तालुक्यात पर्यटन व औद्योगिक केंद्रे निर्माण करून तरुणांना रोजगारावर अधिक भर देण्याचे आवाहन केले.
या जनसंकल्प यात्रेला मंत्री गोविंद कारजोळ, बैरती बसवराज, राज्यसभा सदस्य इरण्णा कडाडी, आमदार अभय पाटील, अनिल बेनके, महांतेश दोड्डगौडर, माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी आदी उपस्थित होते.


Recent Comments