Vijayapura

विजापुरात जिल्हाधिकाऱ्यांसमोरच काँग्रेस-भाजप नेत्यांचा हायड्रामा !

Share

जिल्हाधिकाऱ्यांसमोरच काँग्रेस-भाजप नेत्यांचा हायड्रामा झाल्याची घटना बुधवारी विजापूर जिल्ह्यातील बबलेश्वर शहरात तहसील कार्यालयासमोर घडली.

भाजप नेते व महामंडळाचे अध्यक्ष विजूगौडा पाटील आणि काँग्रेसचे विधान परिषद सदस्य सुनीलगौडा पाटील यांच्यात क्षुल्लक कारणावरून जोरदार वादावादी झाली. दोघांनीही एकेरीवर येत एकमेकाला सुनावले. तू तोंड बंद करा, तू मोठ्याने बोलू नको असे सुनावत दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. “जिल्हाधिकार्‍यांचे पाऊल गावाकडे” या कार्यक्रमासाठी जिल्हाधिकारी विजयमहांतेश दानम्मनवर यांच्या तालुका दौऱ्यात हा वाद झाला. झाली. अखेर जिल्हाधिकाऱ्यांनीच या दोघांमधील वाद मिटवला.

Tags: