Belagavi

विलास शिवाजी पन्हाळकर यांचे निधन

Share

बेळगावातील भडकल गल्ली येथील प्रतिष्ठित नागरिक, नामवंत बांधकाम व्यवसायिक, सामाजिक कार्यकर्ते व विलास शिवाजी पन्हाळकर यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. ते ४९ वर्षांचे होते.

विलास पन्हाळकर यांचे काल मंगळवार दिनांक ८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. ते श्री नाभिक समाज सुधारणा मंडळ बेळगाव या संस्थेचे विश्वस्त तसेच भडकल गल्ली, कोळी गल्ली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे सक्रिय कार्यकर्ते होते. त्यांच्या मागे आई, पत्नी, २ मुलगे, १ मुलगी असा परिवार आहे. गुरूवार दिनांक १० नोव्हेंबर सकाळी रक्षा विसर्जन होणार असल्याचे कुटुंबीयांनी कळविले आहे.

Tags:

shivaji panhalkar death