आमदार सतीश जारकीहोळी यांनी हिंदूंबद्दल केलेल्या विधानानंतर राज्यभरात याचा निषेध केला जात असून आंदर सतीश जारकीहोळी यांनी आपले तोंड बंद ठेवावे, असा सल्ला विजापूरचे आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ यांनी दिलाय.
विजापूरमध्ये आमदार यत्नाळ यांच्या नेतृत्वाखाली भाजप कार्यकर्त्यांनी निषेध मोर्चा काढून आमदार सतीश जारकीहोळी यांचा निषेध केला. विजापुरात सिद्धेश्वर देवस्थान ते गांधीचौकपर्यंत निषेध मोर्चा काढून जारकीहोळी यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना आम. यत्नाळ म्हणाले, हिंदूंबाबत आमदार सतीश जारकीहोळी यांनी केलेले विधान हे निषेधार्थ आहे. हजारो वर्षांचा इतिहास असलेल्या हिंदू धर्माविषयी बोलताना आमदारांना लाज वाटली पाहिजे, त्यांनी तमाम हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या असून यापुढे आमदार सतीश जारकीहोळी यांनी तोंड बंद ठेवावे, असा सल्ला त्यांनी दिला. आगामी निवडणुकीत हिंदूंची ताकद काय असते हेदेखील दाखवून देऊ असा इशाराही आमदार यत्नाळांनी दिला.


Recent Comments