Belagavi

मुतगा येथे रस्ता डांबरीकरणाला आ. हेब्बाळकर यांनी दिली चालना

Share

आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील मुतगा गावातील शेतकऱ्यांच्या शेताना जोडणाऱ्या रस्त्यांसाठी 2 कोटी रुपये निधी मंजूर करून रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाला चालना दिली.

‘शेतकरी हा देशाचा कणा आहे. देशाच्या हितासाठी ते भाजीपाला आणि धान्य पिकवण्यात व्यस्त आहेत. रात्रंदिवस निस्वार्थी सेवेत गुंतलेल्या शेतकऱ्यांच्या कष्टाला प्रतिसाद देत त्यांच्या सेवेसाठी मी सदैव तत्पर आहे. शेतकऱ्यांची सेवा करण्याची संधी मिळणे हे माझे भाग्य आहे’ असे आ. लक्ष्मी हेब्बाळकर याप्रसंगी सांगितले.


यावेळी गावातील ज्येष्ठ नेते भाऊ शिंदोळकर, युवक काँग्रेस नेते मृणाल हेब्बाळकर, राजू पाटील, शरद पाटील, सुनील पाटील, शानूर नदाफ, महंमद मुल्ला, गजानन कणबरकर, गजू पाटील, श्याम मुतगेकर, मारुती पाटील, रायण्णा कंपी, पिंटू मल्लवगोळ, विश्वनाथ मल्लुर, किरण पाटील, पिंटू पुजारी, नागेश देसाई, रवी कोटबागी, ​​रुक्मिणी सिंगारी, पक्षाचे कार्यकर्ते व निकटवर्तीय आदी उपस्थित होते.

Tags:

egislator-laxmi-hebbalkar-drive-the-road-work-of-2-crore/