ताज थ्रेड्स व हँडलूम गुड्स आणि यश कम्युनिकेशन्स यांच्या संयुक्त विद्यमाने मंगल ग्राउंड, खानापूर रोड, गोवावेस येथे आयोजित केलेल्या ‘न्यू इंडियन क्राफ्ट एक्सपो’ चा शानदार शुभारंभ मंगळवारी सायंकाळी मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला.
कर्नाटक राज्य हस्तकला महामंडळाचे चेअरमन मारुती अष्टगी आणि बेळगाव स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष महादेव चौगुले यांच्या हस्ते संपन्न झालेल्या या उद्घाटन समारंभास लघुउद्योग भारतीच्या बेळगाव जिल्हा समन्वयक प्रिया पुराणिक, एन आय एस कोच पटियाला च्या कुस्ती प्रशिक्षक स्मिता पाटील, महिला हॉटेल व्यावसायिक शुभांगी भोसले, बेळगाव चेम्बर ऑफ कॉमर्स एंड इंडस्ट्रीजचे माजी अध्यक्ष विकास कलघटगी आणि पायोनियर बँकेचे संचालक अनंत लाड यांच्या प्रमुख उपस्थितीत या प्रदर्शनाचा प्रारंभ झाला. पाहुण्यांनी फीत सोडून आणि दीप प्रज्वलित करून प्रदर्शनाचे उद्घाटन केले. प्रदर्शनाचे आयोजक प्रकाश कालकुंद्रीकर यांनी उपस्थितांचे स्वागत केल्यावर आशुतोष शर्मा यांनी पाहुण्यांना पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन स्वागत केले.

यावेळी बोलताना उद्योजक महादेव चौगुले म्हणाले की, उद्यमबागेत ऑटोमायझेशनमुळे वस्तूंचे उत्पादन मोठ्या प्रमाणात करता येते पण हस्तकला उद्योगात स्वतःच्या हाताने बनवलेल्या वस्तू तयार करण्यासाठी बराच वेळ लागतो. अशा प्रकारच्या प्रदर्शनाचे आयोजन करून आयोजकांनी शेकडा लोकांचा उदरनिर्वाह चालवलाय. अशा प्रकारची प्रदर्शने आयोजित करणे हे कठीण काम आहे. बेळगावकर त्याला चांगला प्रतिसाद देतील, असा मला विश्वास वाटतो असे ते म्हणाले
प्रमुख पाहुणे मारुती अष्टगी म्हणाले की,” हस्तकलेच्या वस्तूंच्या उत्पादनानंतर त्या कोठे विकाव्यात याची उत्पादकांना चिंता असते. पण आशुतोष शर्मासारख्या आयोजकांनी ते काम सोपे केले असून, देशाच्या विविध भागातील शेकडो व्यापारी व कारागिरांना येथे एकत्र आणले आहे. हा अत्यंत भव्य मेळावा असून एखाद्या व्यक्तीला स्वतःच्या घरासाठी लागणाऱ्या सर्व काही वस्तू येथे उपलब्ध आहेत. अशा प्रकारचे उपक्रम बेळगावत वारंवार व्हायला हवेत. त्यामुळे बेळगावकरांना नवनवीन व अत्याधुनिक वस्तू पाहता येतील .या प्रदर्शनाचा बेळगाव करणारानी लाभ घ्यावा असे आवाहनही श्री अष्टगी यांनी केले.
आजवर बेळगावात अनेक प्रदर्शने झाली पण या सर्व प्रदर्शनापेक्षा वेगळ्या प्रकारचे हे प्रदर्शन बेळगावकरांना निश्चित आवडेल असा विश्वास अनंत लाड यांनी व्यक्त केला. याप्रसंगी लघु उद्योग भारतीच्या समन्वयक प्रिया पुराणिक यांचेही भाषण झाले. यश कम्युनिकेशनचे विनय कदम यांनी आभार मानले. एक महिनाभर चालणाऱ्या या प्रदर्शनात देशाच्या विविध भागात हाताने तयार केलेल्या अनेक वस्तू, तसेच विविध भागातून आलेल्या क्रोकरी व खाद्यपदार्थांचे स्टॉल्स लावण्यात आले आहेत. याप्रसंगी सुरेश वीरगौडर, दीपक गुप्ता याचबरोबर इतर अनेक मान्यवर उपस्थित होते


Recent Comments