Belagavi

बेळगावात मतदार यादी पुनरिक्षणाबाबत जागृतीसाठी सायकल रॅली

Share

मतदार यादीचे विशेष संक्षिप्त पुनरिक्षण करण्याबाबत जनजागृती करण्यासाठी बेळगाव महानगर पालिकेच्या वतीने आज शहरातील किल्ला तलावापासून सायकल रॅली काढण्यात आली.


जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी आज, बुधवारी सकाळी किल्ला तलावाजवळ मतदार यादी पुनरिक्षण जनजागृती रॅलीला झेंडा दाखवून चालना दिली. किल्ला तलाव अशोक सर्कलपासून निघालेली सायकल रॅली आरटीओ सर्कल, चन्नम्मा सर्कल, कॉलेज रोड मार्गे धर्मवीर संभाजी महाराज चौकात विसर्जित झाली. रॅलीमध्ये बेळगाव पेडलर क्लबच्या सदस्यांनीही सहभाग घेतला.
यावेळी अपर जिल्हाधिकारी अशोक दुडगुंटी, महापालिका आयुक्त रुद्रेश घाळी आदी उपस्थित होते.

Tags:

belgaum epic awareness cycle rally