बेळगावमध्ये आयोजिण्यात आलेल्या जिल्हास्तरीय युवा महोत्सव कार्यक्रमात, जिल्ह्यातील विविध भागातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन आपली कला सादर केली.
बेळगाव जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, युवा सक्षमीकरण आणि क्रीडा विभाग आणि नेहरू केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय युवा महोत्सव या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन राष्ट्रीय युवा पुरस्कार विजेते मल्लेश चौगुले यांच्या हस्ते झाले. यावेळी विद्यार्थ्यांनी लोकनृत्य, गीतगायन, वाद्यवादन, यासह विविध कला सादर केल्या. जिल्ह्यातील १४ तालुक्यांतील विविध प्रकारच्या कला पथकांनी तसेच ३०० हून अधिक विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला होता.

यावेळी बोलताना राज्य युवा पुरस्कार विजेते आणि कर्नाटक राज्य युवा संघाचे अध्यक्ष सिद्दण्णा दुर्गुंडी यांनी या कार्यक्रमाविषयी अधिक माहिती दिली. दोन व्यासपीठावर होणाऱ्या या कार्यक्रमातील विजेत्या विद्यार्थ्यांना राज्यस्तरीय युवा महोत्सवात संधी दिली जाणार असून प्रथा, द्वितीय, आणि तृतीय असे क्रमांक काढण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अर्जुन पुरस्कार विजेते मुकुंद किल्लेकर हे होते. तर मुख्य अतिथी म्हणून कन्नड आणि संस्कृती विभागाच्या उपसंचालिका विद्यावती भजंत्री या उपस्थित होत्या.,नेहरू युवा केंद्र डीवायओ रोहित कलरा, राजेंद्र कोलकार यांच्यासह रामचंद्र मेलमणी, राघवेंद्र कांबळे, महालक्ष्मी माडमगेरी, यल्लाप्पा हुदली, वाय बी कळ्ळीगुद्दी, विजयनगर येथील लोककलाकार घोळाप्पा आदी उपस्थित होते.


Recent Comments