police

विजापुरात आयआरबी फोर्सच्या वार्षिक क्रीडास्पर्धा उत्साहात

Share

विजापूर येथे इंडिया रिझर्व्ह बटालियनच्या विजापूर विभागातील दलासाठी क्रीडास्पर्धेचे आयोजन करणात आले होते.

या क्रीडा स्पर्धेला विजापूरचे जिल्हाधिकारी विजयमहांतेश दानम्मन्नवर यांच्याहस्ते शुभारंभ करण्यात आला. यावेळी बोलताना ते म्हणाले, देशाची अंतर्गत सुरक्षा अबाधित राखण्यासाठी पोलिस खात्याची भूमिका महत्त्वाची असते. पोलीस विभागातील कर्मचाऱ्यांनी नेहमी तत्पर असावे, शक्य तितक्या क्रीडा स्पर्धांमध्ये सामील व्हावे, यामुळे तणावाशिवाय आणि अधिक सक्रिय होऊन काम करण्यास मदत होईल

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आयआरबी विजापूर विभागाचे कमांडंट एन बी मेळ्ळेगट्टी हे होते. यावेळी उपकमांडंट नंदकुमार सिंगद, सहायक कमांडंट एन पी यडाल, पोलीस निरीक्षक विजय ठक्कण्णावर, महांतेश इट्टी, प्रसन्न लब्बा, महावीर हळींगळी, हुसेन लालकोटी, कल्लनगौड पाटील, अनिलकुमार उंकी, मंजुनाथ आदी उपस्थित होते. यावेळी आयोजित क्रीडा स्पर्धेत उत्साहाने पोलीस विभागातील कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.

Tags: