बेळगाव ग्रामीण मतदार संघातील श्रीक्षेत्र पंत बाळेकुंद्री या गावातील हनुमान नगर येथील रस्त्याच्या विकासकामांचा शुभारंभ काँग्रेस युवा नेते मृणाल हेब्बाळकर यांच्या उपस्थितीत करण्यात आला.
ग्रामीण मतदार संघाच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या १० लाख रुपयांच्या निधीतून सदर रस्त्याचा विकास करण्यात येणार आहे. रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यात येणार असून या कामकाजाचा शुभारंभ आज काँग्रेस युवा नेते मृणाल हेब्बाळकर आणि स्थानिक लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत करण्यात आला.

यावेळी बोलताना मृणाल हेब्बाळकर म्हणाले, आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी आपल्या अनुपस्थितीत देखील मतदारसंघातील विकासकामे मार्गी लावण्यासाठी, संबंधित गावातील लोकप्रतिनिधींना सूचना देऊन, विकासकामाला कोणत्याही कारणास्तव विलंब होणार नाही याची दक्षता घेतली आहे. सदर विकासकामांचा सदुपयोग नागरिकांनी करून घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी स्थानिक रहिवासी, मैनू अगसीमनी, अप्सरा जमादार, प्रेम कोलकात्र्म होनगौडा पाटील, जमील मुल्ला, प्रकाश भजंत्री, मल्लप्पा मिज्जी, सुधाम कोलकार, किशोर उनकल, गोपाल पत्तार आदी उपस्थित होते.


Recent Comments