बेळगाव शहरात आज विविध विकासकामांचा शुभारंभ करण्यात आला असून आमदार अनिल बेनके यांनी आपल्या मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी पुढाकार घेतला आहे.
कोनवाळ गल्ली येथे ३६ लाख रुपयांच्या निधीतून पेव्हर्स आणि ड्रेनेजच्या कामकाजाला प्रारंभ करण्यात आला आहे. रेडिओ कॉम्प्लेक्स येथील ड्रेनेज कामासाठी २१ लाख रुपये, रामलिंग खिंड गल्ली येथील रस्त्याच्या विकासकामासाठी ३१ लाख रुपये, अनसूरकर गल्ली येथील रस्ते व गटाराच्या कामांसाठी १६ लाख रुपये, केळकर बाग येथील रस्ते विकासासाठी ५६ लाख रुपये अशा एकूण ३.९० कोटी रुपयांचा निधी खर्च करून आमदार अनिल बेनके यांच्याहस्ते विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले. (फ्लो)
आपल्या मतदारसंघात रस्ते, गटार, पेव्हर यासह विविध विकासकामांचा शुभारंभ करण्यात आला असून यासाठी एकूण ३.९० कोटी रुपयांच्या निधीचा वापर होणार आहे. या कामकाजाची पाहणी करण्यासाठी जनतेचीच नियुक्ती करण्यात आली असून सर्व विकासकामे दर्जेदार होतील, आणि आगामी काळातही आपल्या मतदार संघाचा विकास सुरूच राहील, असे आश्वासन आमदारांनी दिले.
यावेळी नगरसेवक संतोष पेडणेकर, जयतीर्थ कट्टी, अभिजित सुनगार, बाळू मासरणकर, रामा शिंदोळकर, शशिकांत शिरोळ, अशोक थोरात, निखिल नरसगौडा, प्रदीप किल्लेकर, सुभाष हंडे, गुरुराज आचार्य, प्रसाद लिंगाडे, नितीन कोल्हापुरे, निर्मला काळे, चंद्रकला, सौरभ सावंत, परेश शिंदे आदींसह या प्रभागातील नागरिक उपस्थित होते.


Recent Comments