सतीश जारकीहोळी यांच्या हिंदू धर्माबद्दलचे वक्तव्याबाबत, ही घाणेरडी मानसिकता आहे, ते हिंदू धर्माला तुच्छ लेखत आहेत. हे कितपत योग्य आहे? त्यांच्या वक्तव्याने लोक दुखावले. हे भारत तोडण्याचे षडयंत्र असल्याचा घणाघात मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केला.
हावेरी येथे आज मंगळवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री बोम्मई यांनी हिंदू हा शब्द अश्लील म्हणणार्यांच्या विचारातच घाण आहे. हिंदू धर्म हा सर्वांसाठी श्रद्धा आणि विश्वासाचा धर्म आहे. अशा विश्वासाच्या पायावरच प्रश्नचिन्ह निर्माण करणे अत्यंत निंदनीय आहे. मन कलुषित झाल्याने हा प्रकार घडल्याचा संताप त्यांनी व्यक्त केला.
याहून आश्चर्याची बाब म्हणजे, काँग्रेस पक्षाने या प्रकरणी मौन बाळगले आहे. देशभरातून विरोध होत असतानाही राहुल गांधी आणि सिद्धरामय्या यांनी याबाबत एक चकार शब्दही काढलेला नाही. तसेच भारत जोडो यात्रा करणाऱ्यांना हे भारताचे तुकडे करण्याचे काम आहे हे माहीत नाही का, असा सवालही त्यांनी केला. काँग्रेस पक्षाने भारत तोडो केला आहे, अशी टीका मुख्यमंत्री बोम्मई यांनी केली.
आता जनसंकल्पयात्रेची पहिली सभा शिरहट्टी तालुक्यात होणार आहे. यापूर्वी झालेल्या जनसंकल्प यात्रेला लोकांचा मोठा पाठिंबा मिळाला आहे. नोव्हेंबरमध्ये संकल्पयात्रा पूर्ण केल्यानंतर डिसेंबरमध्ये मी आणि येडियुरप्पा राज्यातील सर्व मतदारसंघांमध्ये रथयात्रा काढणार आहेत. केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना आम्ही जनतेला सांगणार आहोत आणि त्यांचा पाठिंबा घेणार आहोत. 2023 पर्यंत सत्तेत येण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. सिद्धरामय्या यांचे काय झाले हे मला माहीत नाही. मुख्यमंत्री असताना त्यांनी जनआशीर्वाद यात्रा केली होती. पण त्यांना जनतेने आशीर्वाद दिलेला नाही अशी चेष्टा त्यांनी केली. बाइट


Recent Comments