बेळगावात आज, मंगळवारी राहुग्रस्त चंद्रग्रहणावेळी संपूर्ण लाल रक्त चंद्राचे दर्शन झाले आहे.
अवघ्या जगाने केवळ 15 दिवसांच्या अंतरात सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण पाहिले. बेळगाव येथील छायाचित्रकार पी. के. बडिगेर यांनी ब्लड मूनचे दृश्य आपल्या कॅमेऱ्यात टिपले आहे. दिवाळीच्या सणात सूर्यग्रहण झाले. आता 15 दिवसांतच राहुग्रस्त चंद्रग्रहण कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी झाले. 15 दिवसांच्या कालावधीत दोन ग्रहण होत असल्याने ज्योतिषशास्त्रात याला साहजिकच महत्त्व प्राप्त झाले आहे.


Recent Comments