बँकॉकमध्ये आयोजित IIGF २०२२ या आंतरराष्ट्रीय नृत्य स्पर्धेत बेळगाव एम स्टाइल डान्स आणि झुंबा फिटनेस अकादमीच्या नर्तकांनी उत्तम कामगिरी करत रौप्य आणि कांस्यपदक पटकावले आहे.
२६५ स्पर्धकांपैकी पहिल्या २० जागांवर बेळगावच्या एम स्टाईल डान्स आणि झुंबा फिटनेस अकादमीच्या नर्तकांनी यश संपादित केले आहे. पट्टाया, बँकॉक येथे टॉप २० च्या दुसऱ्या फेरीत रौप्य आणि कांस्य पदके पटकावून घवघवीत यश मिळविले आहे.

कोरिओग्राफर महेश जाधव यांनी या सर्व नर्तकांना प्रशिक्षण दिले असून या विजयी स्पर्धकांमध्ये पार्थ गोंम्बरे, प्रेरणा गोंम्बरे, सेजल खांदाळे, वैष्णवी माळगी, माही माळगी, अश्मीता कळ्ळीमनी, संजना चव्हाण , सान्वी मुंगारे, कृतिका गावडे, प्रथमेश मिसाळ, महर्षी शेखनवर आदींचा समावेश आहे.
बेळगावच्या एम स्टाइल डान्स आणि झुंबा फिटनेस अकादमीच्या नर्तकांनी २०१८ मध्ये स्पेनमध्ये झालेल्या स्पर्धेत १० वे स्थान, २०१८ मध्ये दुबई येथे कांस्य पदक, २०१९ मध्ये सुवर्ण पदक, २०२१ मध्ये सुवर्ण पदक, आणि २०२२ मध्ये कांस्यपदक जिंकून बेळगावची कीर्ती परदेशातही पसरवली आहे.


Recent Comments