निपाणी येथे सतीश जारकीहोळी यांच्या नेतृत्वाखाली घरोघरी बुद्ध-बसव-आंबेडकर अशा महापुरुषांच्या तत्वांचा प्रचार करण्यासाठी मानव बंधुत्व वेदिकेचा राज्यस्तरीय कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. निपाणी येथील म्युनिसिपल हायस्कुल मैदानावर भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून मैसूर येथील ज्ञानप्रकाश महास्वामी उपस्थित होते. यावेळी बोलताना ते म्हणाले, अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाणाऱ्या बुद्ध-बसव-आंबेडकरांच्या तत्वांचे आचरण प्रत्येकाने आपल्या जीवनात करावे. मानव बंधुत्व वेदिकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाचे आणि सतीश जारकीहोळी यांचेही त्यांनी कौतुक केले.
महाराष्ट्रातील वकील वैशाली दोळच यांनीही बुद्ध-बसव-आंबेडकरांच्या विचारांचे आजच्या जीवनातील महत्व पटवून दिले. बुद्ध-बसव-आंबेडकरांचे विचारांचे आदर्श आपण आत्मसात करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

यानंतर आमदार सतीश जारकीहोळी बोलताना म्हणाले, हा कार्यक्रम राजकीय नसून सामाजिक आहे. अंधाराकडून प्रकाशाकडे घेऊन जाणारा हा कार्यक्रम प्रत्येक घरात बुद्ध-बसव-आंबेडकरांच्या तत्वांचा प्रचार करण्यासाठी आयोजित केला असून निपाणी येथील चामराज नगर मधील बिदर ते कोलार पर्यंत हा कार्यक्रम आयोजित करण्यात येत असून निवडणुकीनंतर देखील हा कार्यक्रम आयोजित केला जाईल, असे ते म्हणाले.
या कार्यक्रमासाठी सुमारे ३० हजार प्रेक्षकांची उपस्थिती होती. या सर्व प्रेक्षकांसाठी जेवणाची आणि पार्किंची उत्तम सोय कार्यक्रम स्थळी करण्यात आली होती. यावेळी राज्यातील माजी आमदार, नेते, विविध भागातील मानव बंधुत्व वेदिकेचे कार्यकर्ते उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हेब्बाळचे श्री बसव चेतन महास्वामी हे होते.


Recent Comments