चिक्कोडी शहरातील नादुरुस्त रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी करवे कार्यकर्त्यांनी आज रास्ता रोको करून आंदोलन केले.

चिक्कोडीतील खराब रस्ते तातडीने सुर्स्ट करावेत या मागणीसाठी करवे कार्यकर्त्यांनी आज, सोमवारी रास्ता रोको आंदोलन केले. त्यांनी काही काळ चिक्कोडी-मिरज रस्ता रोखून धरला. करवे जिल्हा संयोजक संजू बडिगेर व सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत हुक्केरी यांच्या नेतृत्वाखाली करवे कार्यकर्त्यांनी रस्त्यावर ठिय्या मांडून आंदोलन केले.

चिक्कोडी शहरातील खराब झालेले रस्ते दुरुस्त करण्याची मागणी त्यांनी केली. शहरात नवीन रस्ते न करता जुन्या रस्त्यांवरील खड्डे दुरुस्त केले तरी हरकत नाही. या रस्त्यावरून ये-जा करणारे वाहनधारक जीव मुठीत घेऊन चालत असल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने रस्ते दुरुस्त करण्याची मागणी आंदोलकांनी केली. त्यानंतर सीपीआय आर. आर. पाटील, पीएसआय यमनाप्पा मांग व पोलिसांनी करवे कार्यकर्त्यांची समजूत काढल्यानंतर आंदोलकांनी आंदोलन मागे घेतले.


Recent Comments