राजकीयदृष्ट्या अत्यंत कुतुहलात्मक असणाऱ्या निपाणी मतदार संघाला जेडीएस राज्याध्यक्ष सी एम इब्राहिम यांनी भेट दिल्याने येथील राजकीय वातावरण गरम झाले असून अचानकपणे दिलेल्या भेटीनंतर अनेकजण अचंबित झाले आहेत.

राज्यात अनेक ठिकाणी जेडीएसने मुसंडी मारली असून आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून या पक्षाने हालचाली गतिमान केल्या आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी जेडीएस चे राज्याध्यक्ष सी एम इब्राहिम यांनी आतापासूनच फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली असून आज त्यांनी निपाणी मतदार संघाला भेट दिली. यानंतर अथणी येथील मतदार संघात भेट देऊन रात्री निपाणी मतदार संघात आलेल्या सी एम इब्राहिम यांनी पिरा नु पीर दर्ग्यात दर्शन घेतली. यानंतर जेडीएस कार्यालयाला भेट देऊन अनेक राजकीय विषयांवर चर्चा केली.
यावेळी जेडीएस अल्पसंख्यांक घटक राज्याध्यक्ष शमशुद्दीन खान, बेळगाव विभाग युथ अल्पसंख्यांक राज्य घटक अध्यक्ष जरारखान पठाण, बेळगाव जिल्हा जेडीएस जिल्हाध्यक्ष शंकर मूडलगी, कागवाडचे प्रशांत पाटील, निपाणी ब्लॉक अध्यक्ष प्रसन्न कुमार गुज्जर, चिकोडी अध्यक्ष अमजद अली मुजावर, नागराज जयकर, चिकोडी जिल्हा युथ अल्पसंख्यांक घटक अध्यक्ष समीर पटेल, निपाणी अल्पसंख्याक घटक अध्यक्ष अभीद पकाली आदी उपस्थित होते.


Recent Comments