राज्यस्तरीय पदवीपूर्व ज्युडो चॅम्पियनशिप स्पर्धेत बेळगावच्या युवा सबलीकरण आणि क्रीडा खात्याच्या स्पोर्ट्स हॉस्टेलच्या ज्युडोपटूंनी सर्वाधिक पदके जिंकून जनरल चॅम्पियनशिप पटकावली.
पदवीपूर्व शिक्षण खाते, बेंगळूर आणि पदवीपूर्व शिक्षण खाते कोलार यांच्या संयुक्त विद्यमाने कोलार येथील शासकीय पीयू कॉलेज येथे 2 ते 4 नोव्हेंबर 2022 दरम्यान चॅम्पियनशिपचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत बेळगावच्या युवा सबलीकरण आणि क्रीडा खात्याच्या स्पोर्ट्स हॉस्टेलच्या ज्युडोपटूंनी उत्कृष्ट कामगिरी करत सर्वाधिक पदके जिंकून जनरल चॅम्पियनशिप पटकावली. त्यांनी एकूण 9 सुवर्ण आणि 3 ब्रॉन्झ पदके मिळवत सर्वसाधारण विजेतेपद मिळवले.

मुलींच्या विभागात 44 किलो वजनगटात ऐश्वर्या बी. हिने सुवर्ण, 52 किलो वजनगटात रक्षिता कोमरने सुवर्ण, 70 किलो वजनगटात राधिका डुकरे हिने सुवर्ण, 70+ किलो वजनगटात साईश्वरी कोडचवाडकर हिने सुवर्ण, 57 किलो वजनगटात शीतलने कांस्य, 63 किलो वजनगटात तनिषा जोगाणीने कांस्यपदक पटकावले.

मुलांच्या विभागात 55 किलो वजन गटात प्रकाश यँटेट याने सुवर्ण, 60 किलो वजन गटात अरुण माळीने सुवर्ण, 66 किलो वजनगटात भरमप्पा दलवाईने सुवर्ण, 73 किलो वजनगटात सौरभ पाटीलने सुवर्ण, 81 किलो वजनगटात रोहन बीएसने सुवर्ण, 50 किलो वजनगटात प्रवीण सुतारने कांस्यपदक मिळवले
या सुवर्णपदक विजेत्यांची पुढील महिन्यात होणाऱ्या एसजीएफआय पदवीपूर्व नॅशनल ज्युडो चॅम्पियनशिपसाठी निवड झाली आहे. हे सर्व ज्युडोपटू, ज्युडो प्रशिक्षक रोहिणी पाटील आणि कुतूजा मुलतानी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा स्टेडियम बेळगाव येथे सराव करत आहेत.


Recent Comments