Belagavi

मधमाशांच्या हल्ल्यात शेतकरी महिला गंभीर जखमी

Share

येळ्ळूर शिवारात भातकापणीचा जोर असून आज आपल्याच शेतात भातकापणीला आलेल्या चांगूणा कृष्णा कुगजी, वय 70 यांना मधमाशांनी प्रचंड दंश केल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. त्याचबरोबर इतर दोन महिलाही जखमी झाल्या आहेत.

मधमाशांच्या झुंडीने महिलांवर हल्ला करून त्या चावत असतानाच तिथेच आपल्या शेतात गेलेले राजू मरवे यांनी लागलीच बाजूला अग्नी पेटवून धूर करुन मधमाशांना हुसकावून लावले. त्यानंतर जखमी महिलेच्या तोंडावरील व अंगावरील सर्व काटे काढूण टाकत त्यांच्या घरच्याशी संपर्क साधून बोलावून घेऊन सर्वानाच येळ्ळूर रोड के एल ई मधे घेऊन जा आणि इलाज करा म्हणून सांगितले. मधमाशांच्या हल्ल्यात चांगुणा यांचे तोंड, ओठ मोठ्या प्रमाणात सुजले असून त्यांना चालता येत नसल्याने घरच्यानीं सावकाश बसवत बसवत येळ्ळूर रोडपर्यंत नेऊन नंतर केएलई शताब्दी इस्पितळात दाखल केले.

Tags:

bee-attacked-an-old-woman/