Belagavi

भाजपची जनसंकल्प यात्रा जनतेच्या थडग्यावरचे राजकारण : नेते चुन्नप्पा पुजारी

Share

ऊस उत्पादकांना चांगली बातमी न देणाऱ्या मुख्यमंत्री बोम्मई यांच्यावर हल्लाबोल करत भाजप जनसंकल्प यात्रा करत नसून लोकांच्या थडग्यावर राजकारण करत असल्याचा आरोप शेतकरी नेते चुन्नप्पा पुजारी यांनी केला.

बेळगाव येथे आज, रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना रयत संघटनेचे राज्याध्यक्ष चुन्नप्पा पुजारी म्हणाले, राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी गोड बातमी देतो असे सांगूनही ऊसाचा भाव ठरवला नाही. शुगर लॉबीपुढे ते झुकले आहेत. गेल्या 8 वर्षांपासून 2500 रुपये प्रतिटन भाव देत आहेत. भाजप सरकारने सर्व जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढवल्या आहेत. एफआरपीच्या दरात मोदींनी फसवणूक केली आहे. एफआरपी वगळून 3500 शंभर दर निश्चित करावा अशी आमची मागणी आहे. याबाबत आम्ही शासनाकडे अनेकवेळा पाठपुरावा केला आहे. येत्या बुधवारी बेळगावात येणार्‍या मुख्यमंत्री बोम्मई यांना आम्ही कडक इशारा देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री बोम्मई जे करत आहेत ते जनसंकल्प कार्यक्रम नाही. ते लोकांच्या थडग्यावर राजकारण करत आहेत. याबाबत आरएसएसनेही विचार करावा. उसाचा भाव निश्चित झाला पाहिजे. मुख्यमंत्री ज्या ठिकाणी येतील तिथे आम्ही आंदोलन करू. मुख्यमंत्री महिनाभरापासून खोटे बोलत आहेत. शेतकरी रस्त्यावर आंदोलन करत आहेत आणि तुम्ही जनसंपर्क यात्रा करणार आहात का? असा सवाल करून, मुख्यमंत्र्यांनी ऊस दर ठरवून मगच बेळगावला यावे अशी मागणी पुजारी यांनी केली.

या पत्रकार परिषदेला शेतकरी नेते शिवानंद मुगळीहाळ व अन्य उपस्थित होते

Tags:

balagavi-choonappa-pujari/