भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष बी.वाय. विजयेंद्र यांचे राजकीय भवितव्य उज्ज्वल आहे. त्यांनी जातीचे राजकारण न करता सर्वांना एकत्र बांधण्याची कला आत्मसात केली आहे. लवकरच त्यांना अधिक शक्ती मिळणार असल्याचे भाजप नेते व कृष्णा काडाचे संचालक रवी खानापूर यांनी सांगितले.

भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांचे पुत्र बी. वाय. विजयेंद्र यांच्या वाढदिवसानिमित्त भाजप कार्यकर्त्यांनी विजापूर येथील सिद्धेश्वर मंदिरात विशेष पूजा केली. तसेच नागरिकांना दुधाचे वाटप केले. विजयेंद्र यांना, उत्तम आरोग्य आणि उच्च सामाजिक-राजकीय दर्जा मिळो, अशी प्रार्थना त्यांनी केली. माजी नगरसेवक आणि रामनवमी उत्सव समितीचे अध्यक्ष उमेश वंदाल यावेळी म्हणाले की, विजयेंद्र हे राज्याचे भावी नेते आहेत. ते पुढील मुख्यमंत्री होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. याप्रसंगी युवा नेते शिवानंद भुय्यार यांच्यासह चाहते व कार्यकर्ते उपस्थित होते. फ्लो


Recent Comments