Nippani

निपाणीत कत्तलखान्यातील 28 गायींची सुटका

Share

कत्तलखान्यातून 28 गायींची सुटका केल्याची घटना निपाणी शहरात घडली आहे. गोरक्षकांमुळे या गायींना जीवदान मिळाले आहे.

निपाणीतील एका दर्ग्याजवळील खळ्यात या गायी पाळण्यात आल्या होत्या. गोरक्षकांच्या माहितीवरून निपाणी शहर पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी छापा टाकून या गायींची सुटका केली. बैलांसह 28 गायी वासरांची सुटका करण्यात आली. यापैकी १ गाय मरण पावली. सुटका केलेल्या गायींना निपाणी समाधी मठाच्या गो शाळेत पाठवण्यात आले. निपाणी शहर पोलिसांनी या प्रकरणाच्या तपासाला गती दिली आहे.

Tags:

nippani-28-cow-rescued