खानापूर मतदार संघाच्या आमदार अंजली निंबाळकर या वारंवार आपल्या मतदार संघाच्या विकासासंदर्भात, महिला सबलीकरणासंदर्भात सरकार दरबारी चौकार – षटकार उडवतात. मात्र प्रत्यक्षात हातात बॅट घेऊन आमदार अंजली निंबाळकरांनी क्रीडाप्रेमींचे लक्ष वेधले आहे.

खानापूर मतदार संघाच्या आमदार अंजली निंबाळकर या नेहमीच उत्साही असतात. आपल्या मतदार संघातील अडचणी असोत किंवा विकासकामाबद्दल सरकार दरबारी प्रस्ताव मांडणे असो… नेहमीच त्या प्रत्येक बाबतीत हजरजबाबीपणा दाखवून समस्या सोडविण्याकडे कल देतात. आपल्या दैनंदिन, व्यस्त जीवनातून वेळ काढत त्यांनी कब्बड्डी सुद्धा खेळली. आता चक्क त्यांनी क्रिकेटच्या मैदानात उतरून फलंदाजी साठी बॅट हातात घेतली. खानापूर मतदार संघात आयोजिण्यात आलेल्या टुर्नामेंटमध्ये त्यांनी फलंदाजी करत सर्व प्रेक्षकांचे लक्ष वेधले. त्यांच्या या शैलीचा व्हिडीओ सोशल मीडियावरदेखील वायरल झाला आहे.


Recent Comments