बेळगाव जिल्ह्यातील कागवाड मतदारसंघातील बेडरहट्टी-अथणी रस्त्यावर बस आणि दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. बेडरहट्टी गावातील रहिवासी सिद्धप्पा वाली (३७) असे मृताचे नाव आहे.


सिद्धप्पा वाली हे बेडरहट्टी गावाहून अथणीकडे दुचाकीवरून जात असताना पार्थनहळ्ळी गावाजवळ बस आणि दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. अथणी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन अपघाताचा पंचनामा केला.


Recent Comments