७ नोव्हेंबर रोजी माजी मंत्री विनय कुलकर्णी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजिण्यात आलेल्या कार्यक्रमास लाखो समर्थक उपस्थित राहणार असून या सोहळ्याला एआयसीसी अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचीही उपस्थिती असेल अशी माहिती वि प सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांनी दिली.
बेळगावमध्ये आयोजिण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हि माहिती दिली. माजी मंत्री विनय कुलकर्णी यांचा वाढदिवस मोठ्या थाटात साजरा करण्याचे ठरविण्यात आले असून या कार्यक्रमास धारवाड, बागलकोट, विजापूर आणि बेळगाव येथील विनय कुलकर्णी यांचे समर्थक आणि विविध संस्था या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमासाठी सुमारे ५,००० पोलीस कर्मचारी तैनात करण्याची विनंती करण्यात आल्याचे हट्टीहोळी म्हणाले.
एआयसीसी अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, केपीसीसी अध्यक्ष डी के शिवकुमार, विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या आणि केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांच्यासह सर्व पदाधिकारी, आणि सिनेअभिनेते दर्शन हेदेखील उपस्थित राहणार आहेत. ७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता या कार्यक्रमाची सुरुवात होणार असून सदर कार्यक्रम पक्षविरहित असल्याचे हट्टीहोळी म्हणाले.
सध्या काँग्रेसची लाट उसळली असून काँग्रेसमध्ये प्रवेश घेण्यासाठी अनेकजण इच्छुक आहेत. धारवाड ग्रामीण मतदार संघातून विनय कुलकर्णी यांची उमेदवारी निश्चित असून त्यांनी केलेल्या विकासकामांमुळे ते लोकप्रिय ठरल्याचेही हट्टीहोळी म्हणाले. कित्तूर येथे होणारे सर्व उद्योग इतर जिल्ह्यात जात असून हि खेदाची बाब आहे. यामुळे विविध मोठ्या औद्योगिक कंपन्या कित्तूरमध्ये आणण्यासाठी प्रयत्न करावेत, असे चन्नराज हट्टीहोळी यांनी सांगितले.
सौंदत्ती आणि कुडची मतदार संघात मी ज्या पद्धतीने काम पाहात आहे त्याबद्दल या मतदार संघातील जनतेला माहिती आहे. त्यामुळे ग्रामीण मतदार संघात आपण काम करत आहोत हा आरोप चुकीचा असल्याचे चन्नराज हट्टीहोळी यांनी स्पष्ट केले.
यावेळी कित्तूर येथील काँग्रेस नेते बाबासाहेब पाटील म्हणाले, विनय कुलकर्णी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजिण्यात आलेल्या कार्यक्रमात ५० हजार असं व्यवस्था करण्यात आली आहे. शिवाय या कार्यक्रमाला येणाऱ्या सर्वांसाठी भोजनाचीही व्यवस्था करण्यात आली आहे.
या पत्रकार परिषदेला काँग्रेस नेते धरेप्पा ठकन्नावर, किरण साधूनवर आदी उपस्थित होते.


Recent Comments