Belagavi

लाचप्रकरणी अबकारी निरीक्षक ज्योती मेत्री निलंबित

Share

उत्पादन शुल्क कार्यालयात लाच मागितल्याप्रकरणी उत्पादन शुल्क निरीक्षक ज्योती मेत्री यांना निलंबित करण्यात आले आहे.

विजापूर जिल्ह्यातील मुद्देबिहाळ तालुक्यातील उत्पादन शुल्क विभागातील शुल्क अधिकारी आणि बार मालक यांच्यातील संभाषणाचा व्हिडीओ व्हायरल झाला असून सदर व्हिडीओ प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झाला आहे. उत्पादन शुल्क निरीक्षक ज्योती मेत्री यांनी प्रति बारसाठी १५ हजार रुपये लाच मागितल्याची बाब पुढे आली असून सदर वृत्त प्रसारमाध्यमांवर प्रसारित झाल्यानंतर उत्पादन शुल्क आयुक्तांनी सदर व्यवहाराला स्थगिती दिली आहे.

याचप्रमाणे ज्योती मेत्री यांच्या निलंबनाचे आदेश दिले असून या आदेशाची अंमलबजावणी करून उत्पादन शुल्क आयुक्तांना तीन दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

Tags:

vijapur lady excise inspector jyoti metri suspended