येत्या 11 नोव्हेंबरला ओनके ओबव्वा आणि 22 नोव्हेंबरला असलेल्या कनकदास जयंतीच्या पार्श्वभूमीवर बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आज पूर्वतयारीची बैठक घेण्यात आली.
ओनके ओबव्वा व कनकदास जयंती साजरी करण्यासंदर्भात शुक्रवारी अप्पर जिल्हाधिकारी अशोक दुडगुंटी यांच्या अध्यक्षतेखाली आज, शुक्रवारी पूर्वतयारीची बैठक घेण्यात आली. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी अशोक दुडगुंटी यांनी जयंती कशी साजरी करावी याबाबत समाजाच्या नेत्यांची मते जाणून घेतली.
या बैठकीला कन्नड आणि संस्कृती विभागाच्या सहाय्यक संचालक विद्यावती भजंत्री, सीपीआय सदाशिव कट्टीमनी, विविध खात्यांचे अधिकारी आणि समाजाचे नेते उपस्थित होते.


Recent Comments