protest

विजापुरात यत्नाळ यांच्या निषेधार्थ भव्य मोर्चा

Share

बनजिग समाजाच्या नेत्यांच्या विरोधात अवमानकारक विधाने केलेल्या विजापूरचे भाजप आमदार बसनगौडा पाटील-यत्नाळ यांच्या निषेधार्थ बनजिग समाजाच्या लोकांनी आज विजापुरात भव्य निषेधमोर्चा काढला.

होय, बेळगाव जिल्ह्यात पंचमसाली समाजाला २-ए आरक्षण मिळावे या मागणीसाठी झालेल्या जाहीर सभा आणि मेळाव्यात आ. बसनगौडा पाटील-यत्नाळ आणि माजी आ. विजयानंद काशपन्नावर यांनी बनजिग समाजाच्या विरोधात अवमानकारक आक्षेपार्ह विधाने केल्यावरून बनजिग समाज संतप्त झाला आहे. त्याचेच पडसाद आज विजापुरात उमटले. बनजिग समाज कार्यकर्त्यांनी शहरातील सिद्धेश्वर मंदिरापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत यत्नाळ यांच्या प्रतिमेला फुली मारलेले फलक हाती घेऊन घोषणा देत निषेध मोर्चा काढला. मोर्चात बनजिग समाजाविरोधात हलके बोलणारे आमदार यत्नाळ आणि विजयानंद काशपन्नावर यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत संताप व्यक्त केला. मोर्चेकऱ्यांनी यत्नाळ यांच्यावर कारवाईची मागणी केली.

Tags: