Chikkodi

20 नोव्हेंबर रोजी बळ्ळारीत एसटी अधिवेशन : परिवहन मंत्री बी. श्रीरामलू

Share

२० नोव्हेंबर रोजी बळ्ळारी येथे एसटी मोर्चातर्फे एसटी अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती परिवहन मंत्री बी. श्रीरामलू यांनी दिली.

चिक्कोडी येथील भाजप कार्यालयात आयोजिण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी काँग्रेसवर निशाणा साधत ते म्हणाले, ६० वर्षे काँग्रेसची सत्ता असूनही आरक्षणात वाढ करण्यात आली नाही. ध्येय नसलेल्या काँग्रेस पक्षाने जनतेची दिशाभूल केली आहे.

दिशाहीन पक्षाचे मूल सिध्दरामय्यांसारखे नेते असून मागासवर्गीय जातींचे त्यांनी केवळ राजकारण केल्याचा आरोप त्यांनी केला. काँग्रेसने मागासवर्गीयांना आश्वासने दिली मात्र आपल्या सरकारने हि आश्वासने पूर्ण केली असून काँग्रेसने आगामी निवडणुकीत अस्तित्वापुरत्या जागा जिंकल्या तरी पुरेशा असल्याचा टोला मंत्री श्रीरामलू यांनी लगावला. याचवेळी त्यांनी भारत जोडो पदयात्रेवरूनही टीका केली असून भारत जोडोची नाही तर काँग्रेस जोडोची गरज आहे, अशी खिल्ली उडवली.

या पत्रकार परिषदेला चिकोडी भाजप जिल्हाध्यक्ष राजेश नेरली आदींसह भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते .

Tags:

november-20th-s-t-convention-at-ballari-minister-shriramalu/