बेळगावातील सह्याद्री नगर भागात जनतेच्या मागणीला तत्काळ प्रतिसाद देत बेळगाव ग्रामीण मतदारसंघाच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी तातडीने पथदिव्यांची व्यवस्था केली.
सह्याद्री नगरमधील स्थानिक रहिवाशांनी बुधवारी पथदिव्यांची समस्या मांडण्यासाठी आमदारांचे गृहकार्यालय गाठले आणि त्यांच्या भागातील पथदिव्यांच्या गैरसोयींबाबत विस्तृत चर्चा केली. यानंतर बुधवारी रात्री आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी स्वत: सह्याद्रीनगर परिसराला भेट देऊन महापालिकेच्या अधिकाऱ्यांना या ठिकाणी बोलावून पथदिव्यांची पाहणी करून रहिवाशांच्या हितासाठी तातडीने पथदिवे बसविण्याचे निर्देश दिले.
लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या सूचनेनुसार महापालिकेने आज, गुरुवारी पथदिवे बसविण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यांच्या सूचनांना तत्काळ प्रतिसाद देणाऱ्या अधिकाऱ्यांचे काम स्वागतार्ह आहे, असे लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सांगितले.


Recent Comments