Kagawad

झाडे कधीच आपली फसवणूक करणार नाहीत : श्रीशैल जगद्गुरू

Share

आपली मुले आपल्याला फसवू शकतील परंतु आपण लावलेली झाडे आपल्याला कधीच फसवणार नाहीत, त्यांचे पालन पोषण योग्यपद्धतीने केले तर भविष्यात आपल्याला नक्कीच फळ मिळेल, असे विधान श्रीशैल जगद्गुरू डॉ. चन्नसिद्दराम पंडिताराध्य शिवाचार्य स्वामींनी केले.

येडूर ते श्रीशैल पदयात्रेच्या लोकार्पणानंतर ऐनापूर मार्गे अथणी कडे मार्गस्थ होणाऱ्या शिन्नाळ, तंगड्डी या मार्गावर वृक्षारोपण करण्यात आले. तरुणांना व्यसनापासून मुक्त करण्याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी बोलताना जगद्गुरू म्हणाले, शहरामध्ये कारखाने, रस्ते विकासासाठी यासह इतर कारणांसाठी बेसुमार वृक्षतोड करण्यात येत आहे. भविष्यासाठी हि बाब धोकादायक असून हा धोका ओळखून आपण लक्ष वृक्षारोपण उपक्रम हाती घेतल्याचे स्वामीजी म्हणाले. पर्यावरणाचा ऱ्हास अशाच पद्धतीने सुरु राहिला तर पुढील पिढी आपल्याला माफ करणार नाही. येडूर ते श्रीशैलपर्यंत सुमारे ६०० किलोमोटार अंतरापर्यंतच्या पदयात्रेत एक लाख वृक्षलागवडीचा संकल्प ठेवण्यात आला असून या पदयात्रेच्या मार्गावर ज्या ज्या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले आहे त्या त्या ठिकाणच्या नागरिकांनी वृक्षाचे पालन पोषण करून जतन करावे, असे आवाहन जगद्गुरूंनी केले.

यावेळी आयोजित धर्मसभेत अंबिका नगर, जैनापूर, नूलश्री, शहापूर, अन्दानेश्वर, पालदूत, बनहट्टी येथील स्वामींची उपस्थिती होती. याचप्रमाणे प्रकाश कोरबू, महेश सोलापूर, अरुण गाणीगेर, कुमार अपराज, प्रशांत अपराज, विश्वनाथ नामदार, यमनाप्पा पाटील, सुरेश गाणीगेर , विरुपाक्ष डुगणावर, रावसाहेब चौगुले, सतीश गाणीगेर, निखिल महाजन, मल्लप्पा बेळगली, श्रीशैल अपराज, अण्णासाहेब डुगनवर, तात्यासाब कोरबू आदी उपस्थित होते

Tags:

massive-response-to-jagadguru-shrishail-padyatra/