खानापूर तालुक्यातील दुर्गम भागातील मेंडील येथे विश्वभारती कला व क्रीडा संघ, बेळगाव यांच्या वतीने भव्य खुल्या मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते.

मेंडील हे गाव खानापूर तालुक्याच्या पश्चिम विभागात नैसर्गिक सौंदर्यराजीत वसलेले आहे. ते खानापूर शहरापासून 35 किमी अंतरावर आहे. प्रसिद्ध भीमगड अभयारण्य असलेले खानापूर तालुक्यातील सर्वात लहान गाव म्हणून याची ख्याती आहे. 200 पेक्षा कमी लोकसंख्या असलेले हे गाव डोंगरांनी वेढलेले आहे. दक्षिण भारतातील काश्मीर असे म्हटले तर नवल नाही. या भागातील मुले, तरुण आणि ज्येष्ठ नागरिकांचे मनोबल वाढावे, त्यांच्यामध्ये शिक्षणाबरोबरच योगासने, व्यायाम आणि मैदानी खेळांची गोडी निर्माण व्हावी, त्यांना शारीरिक व मानसिकदृष्ट्या बळकट करण्यासाठी विश्वभारती कला आणि क्रीडा संघटना, बेळगाव यांच्यातर्फे भव्य खुल्या मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी निसर्गाची विहंगम दृश्ये पाहायला मिळाली. यावेळी ज्येष्ठ नागरिक, महिला, पुरुष खुल्या व १० वर्षांखालील मुले व मुली या गटात स्पर्धक मॅरेथॉनमध्ये सहभागी झाले होते.
प्रशिक्षक एल. जी. कोळेकर, दामोदर कणबरकर, एल. डी. पाटील, राजू तुडयेकर, रमाक्का हनबर, डॉ. राजश्री तुडयेकर, महादेव पाटील, मऱ्याप्पा पाटील, विनोद गुरव, पुंडलिक कुऱ्हाडे, प्रदीप सुतार, विष्णू पाटील, सदानंद पाटील, सतीश पाटील, सामाजिक कार्यकर्ते, विश्व भारती कला व क्रीडा संघटनेचे संस्थापक माजी सैनिक अनिल साताप्पा देसाई तसेच मेंडील आणि पाली गाव ग्रामस्थ उपस्थित होते.


Recent Comments