Hukkeri

हुक्केरी पोलिसांकडून वाहतूक जागृती मोहीम

Share

उसवाहू वाहनांसाठी हुक्केरी पोलिसांकडून वाहतूक जागृती मोहीम सुरु करण्यात आलीय. हुक्केरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाहनधारकांनी वाहतूक नियमांचे सक्तीने पालन करावे असे आवाहन हुक्केरी पोलीस निरीक्षक रफीक तहसीलदार यांनी केले आहे.


बेल्लद बागेवाडी येथील विश्वराज साखर कारखान्याला भेट देऊन हुक्केरी पोलीस निरीक्षक रफीक तहसीलदार यांनी ऊसवाहू ट्रॅक्टर व ट्रक चालकांची बैठक घेतली. सर्व वाहनांच्या चालकांकडे वाहन चालविण्याचा परवाना व विमा असणे आवश्यक आहे. मद्यपान करून वाहन चालवू नका, नियम उल्लंघन करून बेदरकारपणे वाहन चालवू नका, रस्त्यावर साउंड सिस्टीम सुरु ठेवून वाहने चालविण्यास बंदी आहे. ऊसाने भरलेल्या वाहनाच्या मागील बाजूस रिफ्लेक्टर लावणे आवश्यक आहे. रस्त्यावर चुकीच्या जागी पार्किंग करून कायद्याचे उल्लंघन केल्यास अशा लोकांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले.

त्यानंतर उसवाहू ट्रॅक्टर आणि ट्रकच्या मागील बाजूस रिफ्लेक्टर लावण्यात आले. यावेळी पोलीस कर्मचारी मंजुनाथ कब्बुरी व विश्वराज साखर कारखान्याचे अधिकारी उपस्थित होते.

Tags:

hukkeri police traffic awareness