चिकोडी तालुक्यातील चिंचणी गावात सिद्धप्रभू कन्नड भवन येथे अल्लमप्रभू सिद्ध संस्थान मठ चिंचणी यांच्या सहयोगाने राज्योत्सव कार्यक्रम आणि कन्नड पुस्तकांचा प्रकाशन सोहळा आयोजिण्यात आला होता.

चिंचणी सिद्ध संस्थान मठाचे अल्लमप्रभू स्वामी आणि चिकोडी संपादना चरमुर्ती मठाचे संपादन स्वामी यांच्या दिव्य सानिध्यात या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी के एल इ कार्याध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त कन्नड रत्न डॉ प्रभाकर कोरे आणि नन्न संगीत व्यासंग या दोन कन्नड पुस्तकांचा प्रकाशन सोहळा सिनेअभिनेते दोड्डाण्णा, माजी विधान परिषद सदस्य महांतेश कवटगीमठ आणि विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.
कर्नाटकच्या एकीकरणात उत्तर कर्नाटकातील जनतेचे योगदान मोठे आहे, मात्र असे असतानाही उत्तर कर्नाटकातील जनता मूलभूत सुविधांपासून वंचित आहे, ही खेदजनक बाब आहे, असे मत डॉ. प्रभाकर कोरे यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले सिनेअभिनेते दोड्डाण्णा यांनी, वाचनाची सवय जोपासण्याविषयी मार्गदर्शन केले. यावेळी त्यांच्या चित्रपटातील डायलॉग बोलून त्यांनी उपस्थितीतांचे मनोरंजनही केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अल्लमप्रभू स्वामीजींनी केले. यावेळी ग्रंथदासोहि कर्नाटक राज्य सहकारी महा मंडळाचे उपाध्यक्ष जगदीश कवटगीमठ आणि चिंचणी येथील साताप्पा कामने यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी लेखक प्रा. बी. एस. गवीमठ, शिरीष जोशी, चिंचणी ग्राम पंचायत अध्यक्षा प्रेमा संजीवकुमार अप्पाजीगोळ आदी उपस्थित होते.


Recent Comments