Belagavi

पाटीदार समाजातर्फे श्री संत जलाराम यांची 223 वी जयंती

Share

बेळगाव येथील पाटीदार समाजातर्फे श्री संत जलाराम यांची 223 वी जयंती भक्तिभावाने साजरी करण्यात आली.

बेळगावात कच्छ कडवा पाटीदार समाज मोठ्या संख्येने असून पाटीदार समाजातर्फे शास्त्रीनगर येथे संत जलाराम यांची 223 वी जयंती साजरी करण्यात आली. माँ उमिया माताजी आणि लक्ष्मी नारायण यांच्यासोबतच पाटीदार समाजाने संत श्री जलाराम बाप्पांवर श्रद्धा ठेवली आहे. पाटीदार भवन येथे सुप्रसिद्ध प्रभात मंडळातर्फे 223 व्या जलाराम जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये समाजातील सर्व सदस्यांनी आरती, भजन, घुण, गरबा सादर केला. त्यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.

भगवान श्री रामाचे पुत्र लव यांच्या वंशाचे श्री रघुवंशी लोहान (ठक्कर) समाजातील संत जलाराम हे कोणत्या विशिष्ट जाती-धर्मापुरते मर्यादित नव्हते, मानवता आणि दानधर्म हा त्यांचा धर्म होता. सर्व धर्माच्या लोकांचा त्यांच्यावर विश्वास होता. ठक्कर, वैष्णव, पटेल, राजपूत, जैन यांच्याबरोबरच मुस्लीम लोकही त्यांना मानतात, 200 वर्षापासून अन्नक्षेत्र गुजरात वीरपूर गगाव येथे सुरु आहे. बेळगावातही दर गुरुवारी अन्नदान केले जाते, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

Tags: