Belagavi

महिलांच्या प्रतिभेला समाजाने प्रोत्साहन द्यावे : डॉ. मैत्रेयिनी गदिगेप्पगौडर

Share

कौटुंबिक जबाबदाऱ्या कुशलतेने हाताळण्यावर लक्ष केंद्रित करणाऱ्या महिला आपल्यातील योग्य कलागुणांना बाहेर काढण्यात मागे पडत आहेत. त्यांच्या प्रतिभेला समाजाने प्रोत्साहन देण्याची गरज आहे असे मत डॉ. मैत्रेयिनी गदिगेप्पगौडर यांनी व्यक्त केले.

बेळगाव शहरातील लिंगायत भवन येथे आयोजित सत्कार कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बेळगावच्या प्रसिद्ध साहित्यिक, समीक्षक डॉ. मैत्रेयिनी गदिगेप्पगौडर बोलत होत्या.
बेळगाव लिंगायत महिला समाजाच्या वतीने आयोजित सत्कार कार्यक्रमात भुवनेश्वरी उत्सव नृत्य स्पर्धेत द्वितीय पारितोषिक व नाट्य स्पर्धेत सांत्वन पारितोषिक पटकावलेल्या महिला सदस्यांचा सत्कार करण्यात आला. यासोबत सुगंधा मुळीमनी यांच्या स्मरणार्थ आयोजित केलेल्या वचन पठण स्पर्धेतील विजेत्या सदस्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. याच निमित्ताने केदारलिंग एकांकिका निर्मिती व सहदिग्दर्शक डॉ. मैत्रेयिनी गदिगेप्पगौडर यांचा गौरव करण्यात आला. फ्लो
यावेळी बोलताना डॉ. मैत्रेयिनी गदिगेप्पगौडर पुढे म्हणाल्या, निसर्गाने मुलींना जन्मताच खूप ज्ञान दिले आहे. आपल्या समाजाने आणि संस्थांनी मुलींमध्ये लपलेल्या अशा अनेक सुप्त कलागुणांना व्यासपीठ आणि संधी उपलब्ध करून देऊन महिलांमधील लपलेली गतिशीलता आणि प्रतिभा ओळखून त्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे बेळगावच्या लिंगायत महिला समाजाचे सेवा कार्य अद्वितीय व अनुकरणीय आहे.

वचन पठण स्पर्धेच्या परीक्षक रोहिणी गंगाधरैया यांनी वचन गायनाच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर प्रमुख पाहुण्या जयश्री निराकारी यांनी वचन पठण स्पर्धेच्या परीक्षक म्हणून आपले अनुभव कथन केले. त्यांचा यावेळी गौरव करण्यात आला.


नयना गिरीगौडर, सचिव गीता गुंडुकल्ले यांनी यांनी प्रार्थना सादर केली. अध्यक्षा वीणा चिन्नन्नवर यांनी स्वागत केले. लिंगायत महिला समाजाच्या ज्येष्ठ सदस्या शैलजा भिंगे, रत्नप्रभा बेल्लद, ज्योती बदामी, जयशीला ब्याकोड व लिंगायत महिला समाजाचे सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

Tags: