तरुण वयात खूप काही मिळविलेल्या आणि कन्नडिगांच्या प्रिय असलेल्या पुनीत राजकुमार यांना “कर्नाटक रत्न” पुरस्कार मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी प्रदान केला.
राज्योत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी 1 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी बेंगळुरू येथील विधानसौधच्या आवारात कन्नडिगांचे लाडके अभिनेते दिवंगत पुनीत राजकुमार यांना मरणोत्तर “कर्नाटक रत्न” पुरस्कार प्रदान केला. त्यांची धर्मपत्नी अश्विनी पुनीत राजकुमार यांनी पुनीत राजकुमार यांच्या वतीने कर्नाटक रत्न पुरस्कार स्वीकारला.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री बोम्मई म्हणाले की, कर्नाटकातील एका रत्नाला कर्नाटक रत्न पुरस्कार देण्यात आला आहे. हे माझे आणि आमच्या सरकारचे भाग्य आहे. देवाचा आशीर्वाद सर्वांवर आहे. पुनीत तुझे चाहते समुद्रासारखे येथे आले आहेत. जे त्यांच्या तुझ्यावरील प्रेमाचा पुरावा आहे. पुनीत पुन्हा कन्नड राज्यात जन्म घेवो अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली.
यावेळी ज्येष्ठ अभिनेते रजनीकांत, राजकुमार कुटुंबातील सदस्य आणि चाहते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.


Recent Comments