Belagavi

कबड्डी खेळण्यात रंगल्या आ. डॉ. अंजली निंबाळकर !

Share

कबड्डी, कबड्डी म्हणत कबड्डी खेळण्यात खानापूरच्या आमदार डॉ. अंजली निंबाळकर चांगल्याच रमल्याचे दृश्य खानापूर तालुक्यातील इदलहोंड गावात पहायला मिळाले. निमित्त होते, दिवाळीनिमित्त गावात आयोजित कबड्डी स्पर्धेचे !

होय, खानापूरच्या आमदार डॉ. अंजली निंबाळकर आपल्या साधेपणामुळे घराघरात ओळखल्या जातात, विकास आणि ग्रामीण खेळांना प्रोत्साहन देतात. आ. निंबाळकर यांची अशीच एक वेगळी झलक नुकतीच इदलहोंड गावात पहायला मिळाली. इदलहोंड गावात दिवाळीनिमित्त आयोजित कबड्डी स्पर्धेच्या उदघाटन समारंभाला आल्यावर औपचारिक उदघाटन केल्यावर छोट्या मुलांसमवेत कबड्डी खेळण्याचा मोह त्यांना आवरला नाही. मुलांसोबत कबड्डी खेळताना त्या मुलांशी अगदी मिसळून गेल्या आणि आपणही राज्य व राष्ट्रीय स्तरावरील कबड्डीपटू असल्याची आठवण करून देत मुलांना प्रोत्साहन दिले.

यावेळी इदलहोंड गावातील स्थानिक लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ, महिला, विद्यार्थ्यांनी या कबड्डी स्पर्धेचा आनंद लुटला.

Tags:

khanapur anjali nimbalkar kabaddi